Ideas

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आभार!!!

गडचिरोली : गडचिरोलीचे तहसीलदार श्री. संतोष आष्टीकर यांची उचलबांगडी केल्याने रिक्त झालेल्या जागेवर दिनांक ०८/०८/२०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील श्री. सचिन जैस्वाल, तहसीलदार (आस्था) यांचेकडे अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला होता. याबाबत शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आझाद समाज पक्षाने आक्षेप घेत सदरची नियुक्ती तातडीने रद्द करण्याची विनंती केलेली होती. याबाबत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गांभीर्याने दखल घेऊन सचिन जैस्वाल यांच्याकडे सोपविलेला अतिरिक्त कार्यभार काढून घेतला व आरमोरी येथील तहसिलदार उषा चौधरी यांचेकडे सोपविला. व भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्या व्यक्तीला प्रशासनात खपवून घेतले जाणार नाही असा संदेश दिला. त्याबाबत शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आझाद समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी श्री.अविश्यांत पंडा यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments