Ideas

गडचिरोली नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी निखिल चरडे तर स्वीकृत सदस्य पदी भाजपचे सुधाकर येणगंधलवार, सागर निंबोळकर तसेच काँग्रेसचे नंदू कायरकर यांची बिनविरोध निवड


गडचिरोली - गडचिरोली नगर परिषद मध्ये आज दि. 15 जानेवारी ला नगर परिषद उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष पदी भाजपचे निखिल चरडे तर स्वीकृत सदस्य पदी भाजपाचे जेष्ठ नेते सुधाकर येनगंधलवार, युवा नेते सागर निंबोळकर तर काँग्रेस तर्फे नंदू कायरकर यांची नियुक्ती करण्यात आली. या संपूर्ण निवड प्रक्रियेत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी अत्यंत महत्त्वाची व निर्णायक भूमिका बजावली. डॉ. होळी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली व योग्य नियोजनामुळे सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड शक्य झाली. त्यांच्या समन्वयक भूमिकेमुळे राजकीय पक्षांमध्ये सुसंवाद साधला गेला आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांनीही सहकार्य करत नियोजनात सहभाग घेतला. मात्र डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनामुळेच ही प्रक्रिया यशस्वी ठरली, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments