Ideas

13 ऑगस्ट रोजी गडचिरोली येथे "भव्य दिव्य तिरंगा पदयात्रेचे" आयोजन.

भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष अनिल कुनघाकर यांचे आवाहन
 गडचिरोली:   स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  अंतर्गत हर घर तिरंगा अभियान गडचिरोली जिल्हात  2 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत मोठ्या उत्साहात राबवले जात आहे, याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी गडचिरोली यांच्या वतीने  भव्य दिव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
सकाळी 8:30 वाजता आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या  कर्तव्य कार्यालय क्रमांक. 1 येथे एकञीकरण व  ठिक  9:00 वाजता   पदयात्रेस  प्रारंभ होणार आहे व  कारगिल चौक गडचिरोली येथे समारोप  करून  त्या परिसरात सामाजिक आपुलकी जोपासत स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील तसेच शहरातील समस्त नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी,  तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  अनिल पांडुरंग कुनघाळकर शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी ,युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments