Ideas

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात सुरु झाली पहिली उच्च दर्जाची बेकरी


● हेडरी गावातील पहिल्या बेकरीचे उद्घाटन 
गडचिरोली हेडरी: 
विकास हा केकसारखा असतो. तो तयार व्हायला वेळ लागतो. पण तयार झाल्यावर तो गोड लागतो. गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील लोकांना हा अनुभव येत आहे. सोमवारी हेडरीमध्ये पहिल्या बेकरीचे उद्घाटन झाले तेव्हा विकासाच्या या यशोगाथेत एक नवीन अध्याय जोडला गेला. 
पुरसलगोंदीच्या सरपंच अरुणा सडमेक, तोडसाच्या सरपंच वनिता कोरामी, नागुलवाडीचे सरपंच नेवलू गावडे, तोडसाचे उपसरपंच प्रशांत आत्राम, नागुलवाडीचे उपसरपंच राजू तिम्मा, पुरसलगोंदीचे  माजी सरपंच कात्या तेलामी, पुरसलगोंदीच्या माजी सरपंच कल्पना आलाम, ग्रामपंचायत सदस्य छाया जेट्टी, आणि लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) चे व्यवस्थापकीय संचालक आणि लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनचे संचालक श्री. बी. प्रभाकरन यांनी हेडरी येथे एका छोट्या पण देखण्या समारंभात ब्लॅक फॉरेस्ट बेकरीचे उद्घाटन केले. परिसरातील लोक ह्याबाबत आनंदी होते आणि बेकरी उत्पादनांचा आस्वाद घेण्यासाठी उत्साहित होते. 
गावातील सरपंचांनी आनंद व्यक्त केला आणि बेकरीचे वर्णन जिल्ह्यातील सकारात्मक परिवर्तनाचे प्रतीक असे केले. श्री. बी. प्रभाकरन म्हणाले की बेकरी ही केवळ एक इमारत नसून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या विकासाचे प्रतिबिंब आहे. “गडचिरोली जिल्हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वोत्तम परिवर्तनकथांपैकी एक म्हणून खूप वेगाने उदयास येत आहे. गडचिरोलीतील लोकांनी आत्मविश्वास पूर्वक लिहिलेल्या या कथेत नवीन प्रशंसनीय अध्याय जोडले जात आहेत. ब्लॅक फॉरेस्ट बेकरीसारख्या उपक्रमांनी त्यांची जीवनशैली समृद्ध करण्याचा लॉईड्स मेटल्सला आनंद आहे,” असे ते म्हणाले. 
यापूर्वी, २७ जून रोजी, कोनसरी गावात देखील ब्लॅक फॉरेस्ट बेकरीचे उद्घाटन करण्यात आले होते. कोनसरीमधील हा पहिला बेकरी आणि फूड प्लाझा आहे. कोनसरी येथे एलएमईएलचे डीआरआय आणि पेलेट प्रकल्प कार्यरत आहेत आणि ४.५ एमटीपीए क्षमतेचा विशाल एकात्मिक पोलाद प्रकल्प प्रस्तावित आहे. 
पूजा आणि उद्घाटनानंतर, श्री. प्रभाकरन यांनी हेडरी स्थित बेकरीला भेट दिली आणि एलएमईएल अधिकाऱ्यांशी तसेच स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला.

Post a Comment

0 Comments