आ. डॉ. मिलिंद नरोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
मंगेशभाऊ मल्लेलवार, अनिलभाऊ तिडके व सामाजिक कार्यकर्ते शिवराम पुल्लूरी यांचे मोलाचे सहकार्य
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील झिगांनूर येथील पोरिया पेंटा गावडे यांच्यावर गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. निधनानंतर मृतदेह स्वगावी नेण्यासाठी गावडे कुटुंबियांपुढे गंभीर आर्थिक अडचण निर्माण झाली होती.
या परिस्थितीत गावडे कुटुंबियांनी सामाजिक कार्यकर्ते शिवराम पुल्लूरी यांना संपर्क साधून संपूर्ण घटना व आर्थिक अडचणींबद्दल सांगितले. माहिती मिळताच पुल्लूरी यांनी त्वरित आपल्या सहकाऱ्यांना — मंगेशभाऊ मल्लेलवार आणि अनिलभाऊ तिडके — यांना ही बाब कळवली.
सामाजिक बांधिलकी जपत या तिघांनी मिळून स्वखर्चाने खाजगी वाहनाची व्यवस्था करून मृतदेह झिगांनूर येथे आदरपूर्वक पोहोचविला.
या संवेदनशील आणि मानवतावादी कार्याबद्दल गावडे कुटुंबियांनी शिवराम पुल्लूरी, मंगेशभाऊ मल्लेलवार आणि अनिलभाऊ तिडके यांचे मनःपूर्वक आभार मानले व समाधान व्यक्त केले.
---


0 Comments