Ideas

प्रभाग क्रमांक 2 मध्ये विकासाची नवी उमेद; अनुभवी, सेवाभावी नेतृत्व म्हणून हर्षल गेडाम-कोमल नैताम हेच नागरिकांचे पसंतीचे चेहरे !



गडचिरोली :  दिं 30/ 11/2025

अनुभव नसलेल्या उमेदवाराबद्दल नागरिकांची नाराजी

निवडणुकीत काहि उमेदवार फक्त "स्थानिक  असण्याचे कारण पुढे करत असले तरी त्यांचा  प्रत्यक्ष लोकांशी संपर्क नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
"  लोकांमध्ये कधी न दिसणाऱ्या आणी अनूभवहीन व्यक्तींना निवडून दिले तर प्रभागाचा विकास कसा होणार? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.


याच पार्श्वभूमीवर हर्षल गेडाम आणि कोमल नैताम यांच्या नावाला प्रभागात विशेष प्रतिसाद मिळताना दिसतो. केंद्रात नरेंद्र मोदीजी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि गडचिरोलीत भाजपाचे आमदार — जर या सर्व साखळीत नगरपरिषदेवरही भाजपाची सत्ता आली, तर प्रभाग २ चा विकास आणखी वेगाने होऊ शकतो, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी जाहिर होताच गडचिरोली प्रभाग क्रमांक २ मध्ये विकासाचा मुद्दा पुन्हा  केंद्रस्थानी आला आहे.प्रभागाचा खरा विकास व्हायचा असेल, तर   अनुभव, जनसंपर्क  आणि निस्वार्थ काम करणारे  उमेदवार यांनाच निवडून द्यावे, अशी भावना नागरिकातून वेक्त  होत आहे.

हर्षल गेडाम : संघटनातून घडलेले, निस्वार्थ सेवेत झोकून दिलेले कार्यकर्ते

ABVP संघटनेतून घडलेले हर्षल गेडाम यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी केलेली सेवा, गरजूंपर्यंत वेळेवर मदत पोहोचवणे, तसेच गेल्या चार–पाच वर्षांपासून प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या सुख–दुःखात सहभागी राहून तत्परतेने मदत करणे — यामुळे त्यांच्याबद्दल लोकांत प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे.

कोमल नैताम : बजरंग दलाशी जोडलेला कुटुंबाचा वारसा आणि समाजहिताची सततची कामगिरी

कोमल नैताम यांच्या कुटुंबाचा बजरंग दलाशी घट्ट संबंध असून, त्यांच्या कुटुंबाने अनेक वर्षांपासून समाजहितासाठी सक्रियपणे काम केले आहे. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, सामाजिक संघटनांना पाठबळ, तरुणांना मार्गदर्शन, तसेच गरजेनुसार मदतकार्य — त्यांच्या घरातून चालणाऱ्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे प्रभागातील नागरिकांशी त्यांचे नाते अधिक दृढ झाले आहे.



अनुभव,+ जनसंपर्क+  सेवा + प्रभागाचा  खरा विकास

प्रभाग क्रमांक २ चा खरा विकास साधायचा असेल तर ज्यांनी  वर्षानुवर्ष लोकांसोबत राहून काम केले,वेळोवेळी  मदत केली आणी समाजसेवेसाठी  निस्वार्थपणे झटले,असाच उमेदवाराला  
 संधी दिली पाहिजे, 
अशी एकमुखी भावना नागरिकांतून पुढे येत आहे.

अनुभव, जनसंपर्क आणि सेवा हि तीन तत्वे जिथे एकञ येतात ,तिथेच विकास होतो  अशी प्रबळ भावना व्यक्त केली जात आहे

Post a Comment

0 Comments