Ideas

शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी; अझीझ नाथानी यांना 'गडचिरोली गौरव' पुरस्कार जाहीर

राजेंद्र सहारे
राईट टाईम न्यूज

गडचिरोली : देशातील आकांक्षित व मागास गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्र उज्ज्वल व मजबूत करताना शिक्षणाला देशभक्ती आणि समाजसेवेची जोड देणारे अझीझ उर्फ (बंटी) हमीद नाथानी यांना गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारा अतिशय प्रतिष्ठेचा 'गडचिरोली गौरव' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुवार, १ जानेवारी रोजी गडचिरोली प्रेसक्लब येथे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्यासह देश व समाजाच्या विकासासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला पत्रकारीतेच्या क्षेत्रातील आघाडीची संस्था प्रेस क्लबच्या वतीने 'गडचिरोली गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी मंगळवार, ६ जानेवारी रोजी स्थानिक गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित पत्रकारदिन सोहळ्यात अझीझ नाथानी यांना मान्यवरांच्या हस्ते 'गडचिरोली गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अझीझ नाथानी हे गेल्या ३० वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटीचे महासचिव म्हणून अझीझ
नाथानी सक्षमतेने नेतृत्व करत आहेत. ते राष्ट्रीय आपत्ती साहाय्य आणि प्रतिसाद पथकाचे सदस्य होते. ही एफओसीयूएसशी संलग्न युरोपीय-आधारित स्वयंसेवी संस्था आहे. २००५ च्या जम्मू आणि काश्मीर भूकंपादरम्यान नाथानी यांनी संस्थेने दत्तक घेतलेल्या उरी जिल्ह्यातील चार गावांमध्ये प्रत्यक्ष मुक्काम करत सेवाकार्य केले. कोविड १९ साथीच्या काळात असंख्य पीपीई किट उपलब्ध करून दिल्या. अझीझ नाथानी यांनी त्यांच्या शाळेवर २४ तास फडकत राहणारा सर्वात उंच राष्ट्रध्वज फडकविला आहे. प्लॅटिनम ज्युबिली स्कूलमध्ये १०० फूट उंच आकाशात फडकणारा ६०० चौरस फूट आकाराचा भव्य तिरंगा ध्वज जिल्ह्यात दाखल झालेल्या प्रत्येकातील देशभक्तीची भावना वृद्धींगत करत आहे.

Post a Comment

0 Comments