Ideas

महालक्ष्मी पूजनात श्रद्धेचा सोहळा — डॉ. अशोक नेते यांच्या हस्ते गडचिरोलीत दीपोत्सवाचा मंगल जल्लोष!

गडचिरोली : 
भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी गडचिरोली येथे शिव कृपा मोटार, ड्रायव्हिंग स्कूल तसेच घरगुती कार्यालयात विधिवत महालक्ष्मी पूजन करून दीपावलीचा पवित्र उत्सव साजरा केला.

या प्रसंगी त्यांनी श्रद्धा, सन्मान आणि परंपरेचा संगम साधत लक्ष्मीदेवीचे पूजन, आरती व प्रसाद वितरण केले. यावेळी डॉ. नेते यांनी आपल्या सहकारी कर्मचारीवृंदांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत गिफ्ट, मिठाई व नवीन कपडे प्रदान करून आनंदाचा क्षण सामायिक केला.

“आपल्या सर्वांच्या जीवनात लक्ष्मीदेवीचे अखंड वास राहो, ऐश्वर्य, आरोग्य, सुख, समाधान व शांतीचे दीप सदैव प्रज्वलित राहोत,” अशी मंगलकामना डॉ. नेते यांनी या वेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित कर्मचारीवर्ग, सहकारी आणि नागरिकांनी मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या सामाजिक बांधिलकी, आत्मीयता आणि सर्वसमावेशक वृत्तीबद्दल मनःपूर्वक आदर व्यक्त केला. दीपोत्सवाच्या मंगल प्रसंगी संपूर्ण परिसर भक्तिभाव, आनंद आणि एकतेच्या प्रकाशात उजळून निघाला.

 “लक्ष्मीपूजनाच्या या पवित्र दिवशी घराघरात सुख, समाधान आणि सौख्याचा प्रकाश फुलो — हाच खरा दीपोत्सवाचा संदेश,” असेही मा.खा. डॉ. नेते यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments