Ideas

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यात हिरहिरिने सहभाग घ्या! - राकाँचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांचे आवाहनगडचिरोली:- राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रत्येक उपक्रम नागरिकांच्या हिताचे असून  पक्षाच्या  कार्यात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी हिरहिरिने सहभाग घ्यावे आणि नागपुरातील हिवाळी अधिवेशनात येत्या 19 डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने पक्षाच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी केले.
     ते सोमवार 5 डिसेंबर रोजी स्थानिक  राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील प्रांगनात 'वेध भविष्याचा-विचार राष्ट्रवादीचा' उपक्रमात व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत अध्यक्षीय स्थानावरुन बोलत होते. 


    यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथि म्हणून राज्याचे माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आमदार मनोहर चंद्रिकापूरे, माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्षा रवींद्र वासेकर, जेष्ठ नेते नानाभाऊ नाकाडे, प्रदेश संघटन सचिव युनुस शेख,रा. महिला काँ.चे जिल्हाध्यक्ष शाहीन भाभी हकीम,  युवक जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
    अध्यक्षीय स्थानावरुन पुढे बोलताना, रा.काँ.चे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शोषित, पीड़ित, वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी झटणारा पक्ष असून शेतकरी, कष्टकरी, वाढती महागाई, खाजगीकरणाच्या विरोधात उठून पेटन्यासाठी आणि महाराष्ट्र शासना पर्यंत आवाज बुलंद करण्यासाठी येत्या 19 डिसेंबर रोजी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या खंबिर नेतृत्वाखाली ऐतिहासिक व भव्य मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चात अधिक संख्येने नागरिक सामील होण्याचे आवाहन करून नरहरी झिरवाळ यांनी राज्याचे व देशाचे अन्यायकारक धोरण रोखणे काळाची गरज असल्याचे म्हणत मोलाचे मार्गदर्शन केले.
    उल्लेखनीय म्हणजे याचवेळी 'वेध भविष्याचा-विचार राष्ट्रवादीचा'  या अभिनव उपक्रमावरही प्रकाश टाकन्यात आला.
       या कार्यक्रमाला अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एस.एन.पठाण सर,सेवादल प्रदेश संघटन सचिव बुधाजी सिडाम, जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर,  सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, महिला जिल्हाध्यक्षा प्रमिलाताई रामटेके, अल्पसंख्याक प्रदेश महासचिव सलिम बुधवानी गडचिरोली विधानसभा अध्यक्ष ठाकरे सर,गडचिरोली तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, शहर अध्यक्ष विजय गोरडवार, शहर कार्याअध्यक्ष कपिल बागडे,जिल्हा उपाध्यक्ष सुनील नंदनवार, जिल्हा सचिव संजय साळवे, किशोर तलमले, आरमोरी शहर अध्यक्ष अमिन लालानी,वडसा तालुका अध्यक्ष क्षितिज उके,अहेरी तालुका अध्यक्ष शिंनु विंरगोनवार,धानोरा तालुका अध्यक्ष सोपान मशाखेत्री, सेवादल जिल्हाध्यक्षा अमर खंडारे,चेतन पेंदाम, प्रसाद पवार, अमोल कुळमेथे, मिनलताई चिमुरकर, निता बोबाटे, सुवर्णा पवार, छाया निबंरत,अभय इंदुरकर, महेंद्र लांडगे, लतिफ शेख,मनोज तलमले शैलेश पोटवार,देवानंद बोरकर, सविता चव्हाण, लता शेंद्रे पाटील, गुलाम शेख,अमोल मुक्कावार उपस्थित होते.
    सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविन्द्र वासेकर यांनी केले तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले उपस्थितांचे आभार लीलाधर भरडकर यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष , तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments