Ideas

८ डिसेंबरला संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव व तेली समाज मेळावा




 गडचिरोली :- 
      संताजी सोशल मंडळ गडचिरोली, महाराष्ट्र तैलिक महासंघ, विदर्भ तैलिक महासंघ जिल्हा गडचिरोली, तेली समाज समिती सर्वोदय वार्ड , तेली समाज सेवा समिती हनुमान वार्ड गडचिरोली, संत जगनाडे महाराज बहुउदेशीय संस्था गडचिरोली, संताजी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली व तेली समाजाचे संयुक्त विद्यमाने दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव कार्यक्रमा निमित्त भव्य तेली समाज मेळाव्याचे आयोजन  संताजी सोशल मंडळ च्या सभागृहात करण्यात आले आहे.
     4 डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात तेली  समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला तेली समाजाचे नेते व संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रमोदजी पिपरे, प्राध्यापक देवानंद कांबळी एडवोकेट रामदास कुनघाडकर राजेश ईटणकर सुरेश भांडेकर रवींद्र ठाकरे भगवानजी ठाकरे विलास निंभोरकर सुधाकर दूधबावरे भैय्याजी सोमनकर विठ्ठलराव कोठारे, गिरीधर सहारे माजी नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, विलास नैताम व तेली समाजाचे ज्येष्ठ नेते व विविध तेली संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
      या बैठकीमध्ये 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव व तेली समाज मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व  कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नियोजन करण्यात आले 8 डिसेंबर रोजी सर्वप्रथम सकाळी 11 वाजता इंदिरा गांधी चौकात संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून जयंती समारोहाची सुरुवात करण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी 12 वाजता संताजी सोशल मंडळच्या सभागृहात भव्य तेली समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातील व शहरातील तेली समाज बांधवांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तेली समाज गडचिरोली व संताजी सोशल मंडळ गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments