Ideas

अवघ्या चार दिवसांत थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत धडक;नगराध्यक्ष प्रणोतीताईंना लाडक्या मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद...!


 गडचिरोली: नुकत्याच पार पडलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर अवघ्या चार दिवसांतच नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोतीताई सागर निंबोरकर यांनी थेट महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री
तथा गडचिरोलीचे पालकमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मुंबईतील कार्यालयात सदिच्छा भेट घेत
आशीर्वाद प्राप्त केले.

या भेटीमुळे शहराच्या राजकीय व विकासात्मक वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून,शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष प्रणोतीताई किती सजग, सक्रिय आणि परिणामकारक नेतृत्व देत आहेत,
हे स्पष्टपणे दिसून आले आहे.

 चार दिवसांत कृती, हीच खरी ओळख

या भेटीदरम्यान शहराच्या सर्वांगीण विकास आराखड्यावर सखोल, सकारात्मक आणि ठोस चर्चा करण्यात आली.रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा, रोजगारनिर्मिती आणि भविष्यातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठाम शब्द दिला, ही बाब शहरासाठी अत्यंत आश्वासक ठरत आहे.

 निवडणूक संपताच विकासाची सुरुवात

निवडणुकीपूर्वी दिलेले विकासमुखी व जनसेवेचे आश्वासन प्रणोतीताई निंबोरकर यांनी केवळ शब्दांत न ठेवता
चार दिवसांत थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून कृतीत उतरवले,यामुळे जनतेत विश्वास अधिक दृढ झाला आहे.

 सक्षम नेतृत्वाची मजबूत साथ

या महत्त्वपूर्ण भेटीवेळी बंटी भाऊ उर्फ कीर्ती कुमार भांगडिया,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,,गोविंदजी सारडा,सागर निंबोरकर, माजी आमदार नामदेव उसेंडि,माजी आमदार देवरावजी होळी
यांची उपस्थिती लाभली.

 जनतेत विश्वास, शहरात परिवर्तनाची चाहूल

मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे अनुभवी नेतृत्व आणि नगराध्यक्ष प्रणोतीताई निंबोरकर यांची वेगवान, स्पष्ट व निर्णयक्षम कार्यशैली यांच्या समन्वयातून शहराचा विकास वेगाने होणार असून, येणारा काळ हा परिवर्तनाचा असेल,
असा ठाम विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

 नेतृत्व मजबूत… निर्णय ठाम… आणि विकास अटळ!

 शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णायक सुरुवात!

Post a Comment

0 Comments