Ideas

कार्यकर्त्यांशी नातं जपणाऱ्या चित्राताई वाघ; नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोतीताई निंबोरकरांना दिला प्रत्यक्ष आशीर्वाद!..


संपादक : राजेंद्र सहारे
8830435322
गडचिरोली: नुकत्याच नगराध्यक्ष म्हणून भाजप उमेदवार प्रणोतीताई सागर निंबोरकर निवडून आल्यावर त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी आमदार चित्राताई वाघ यांनी प्रत्यक्ष भेट देत आशीर्वाद दिला. व्यस्त राजकीय कार्यक्रमांमधून वेळ काढून स्वतः उपस्थित राहून सन्मान करणे, हे चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वातील मोठेपणा व कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी दर्शवते, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त होत आहे.

या भेटीमुळे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोतीताईंना नवे बळ मिळाले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी हा क्षण प्रेरणादायी ठरला आहे. चित्राताईंनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आणि शुभेच्छांमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी बंटी भाऊ उर्फ कीर्तीकुमार भांगळिया, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोतीताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

कार्यकर्त्यांशी थेट संवाद, प्रत्यक्ष उपस्थिती आणि मनापासून दिलेले आशीर्वाद — हेच चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाचे खरे वैशिष्ट्य असल्याची भावना यावेळी प्रकर्षाने व्यक्त झाली.

चित्राताई वाघ यांना मनःपूर्वक धन्यवाद आणि नगराध्यक्ष प्रणोतीताई निंबोरकर यांना उज्ज्वल कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments