गडचिरोली:स्नेहनगर (संघर्ष नगर) प्रभाग क्र. 03, गडचिरोली येथे देशाचे थोर नेतृत्व, माजी पंतप्रधान व भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सुशासन दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम मा. श्री. प्रमोद पिपरे, संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ. योगिता प्रमोद पिपरे, जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाडी, माजी नगराध्यक्षा तसेच नवनिर्वाचित नगरसेवक मा. श्री. अनिल कुणघाडकर, भाजपा शहराध्यक्ष, गडचिरोली उपस्थित होते.
कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेविका सौ. योगिता पिपरे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्व. अटलजी यांचे सुशासन म्हणजे पारदर्शकता, जनतेप्रती जबाबदारी आणि सर्वसमावेशक विकास. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रभागातील प्रत्येक घटकासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहोत.” महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देत त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव उपलब्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात मा. श्री. प्रमोद पिपरे यांनी अटलजींच्या दूरदृष्टीचा उल्लेख करत सांगितले की, “सुशासन हे केवळ घोषवाक्य नसून कृतीतून दिसले पाहिजे. गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे.” त्यांनी युवा व महिलांना विकासाच्या प्रवाहात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी पुष्पाताई करकाडे, पल्लवीताई बारापात्रे, महेश टिपले, संजय बोधलकर, विनोद लटारे, कौशल यादव, सुस्मिता लाटेलवार यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत, स्व. अटलजींच्या विचारांना कृतीत उतरवण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.


0 Comments