Ideas

गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासास नवा बळ; नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांची आदिवासी विकास मंत्र्यांशी सखोल चर्चा!

राईट टाइम न्यूज 

गडचिरोली :गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरावी अशी सदिच्छा भेट आदिवासी विकास मंत्री मा. श्री. अशोकजी उईके यांच्यासोबत घेण्यात आली. या भेटीने गडचिरोलीच्या विकास प्रक्रियेला नवे बळ मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या प्रसंगी गडचिरोलीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा. प्रणोती निंबोरकर यांचे मा. श्री. अशोकजी उईके यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. नगरविकासाच्या जबाबदारीतून शहराचा सर्वांगीण व समतोल विकास साधण्यासाठी कार्यरत राहण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

भेटीदरम्यान गडचिरोली शहरातील नागरी समस्या, पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच आदिवासी बहुल भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या शाश्वत विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे उपयोग करण्यावर मंत्री उईके यांनी भर दिला.

नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांनी गडचिरोली शहराच्या विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचा समन्वय साधून काम करण्याची ठाम भूमिका व्यक्त केली. शहरातील रखडलेली विकासकामे पूर्ण करणे, तसेच नवीन विकास प्रकल्प राबविण्यासाठी शासनाच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गडचिरोलीच्या विकासासाठी सकारात्मक व दूरगामी निर्णय घेण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या सदिच्छा भेटीप्रसंगी माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, माजी आमदार नागदेवराव उसेंडि  सागर निंबोरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मिळून गडचिरोली शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

ही भेट गडचिरोली शहराच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरेल, तसेच आगामी काळात विविध विकासकामांना गती मिळेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments