गडचिरोली:जिंकलेलं मत हे आमच्यासाठी केवळ आकडा नसून, जनतेने आमच्यावर दाखवलेला अपार विश्वास, प्रेम आणि भक्कम साथ याचे जिवंत प्रतीक आहे, असे भावनिक शब्दांत सौ. योगिता प्रमोद पिपरे यांनी गडचिरोलीतील जनतेचे आभार व्यक्त केले.
या विजयामुळे आमच्यावर मोठी जबाबदारी आली असून, जनतेने दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता ही जबाबदारी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि ठामपणे निभावू, अशी ग्वाही त्यांनी दिली. नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि मूलभूत गरजांना सर्वोच्च प्राधान्य देत नगरपरिषद गडचिरोलीच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकासासाठी कार्य सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
“माझा प्रत्येक मतदार माझ्यासाठी खास आहे. हा विजय माझा वैयक्तिक नसून, गडचिरोलीच्या जनतेचा विजय आहे. जनतेने दिलेल्या या प्रेमाची परतफेड कामातूनच होईल,” असे ठाम आणि आक्रमक शब्दांत त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा, माजी नगराध्यक्ष आणि नवनियुक्त नगरसेवक, नगरपरिषद गडचिरोली या नात्याने जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी अधिक जोमाने, अधिक वेगाने आणि अधिक पारदर्शकपणे काम करू, असा निर्धार सौ. योगिता प्रमोद पिपरे यांनी व्यक्त केला.
शेवटी त्यांनी गडचिरोलीतील सर्व मतदार, कार्यकर्ते, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.


0 Comments