धानोरा :
स्थानीक, धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा-संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बी ए तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेली विद्यार्थ्यिंनी कु *अश्विनी गजानन पदा* गोंडवाना विद्यापीठाच्या वेस्ट झोन आंतर- विद्यापीठीय *ज्युदो* स्पर्धेच्या महिला संघात डॉ संजय मुरकुटे यांच्या मार्गदर्शनात नुकतीच निवड झाली.
वेस्ट झोन आंतर-विद्यापीठ ज्युदो वुमेन्स ही स्पर्धा दिनांक १० ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भोपाल येथील एसएजीई या विद्यापीठात आयोजित असून गोंडवाना विद्यापीठाचे व महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कु अश्विनी गजानन पदा भोपाल येथे प्रस्थान करीत आहे.
तिच्या सहभागाबद्दल आणि यशस्वीतेसाठी संस्थाध्यक्षा- श्रीमती शालिनीताई रमेशचंद्र मुनघाटे, कार्याध्यक्षा सौ आशीताई रोहनकर यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ उदय थुल, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि परिसरातील सर्व चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.


0 Comments