गडचिरोली :
प्रभाग क्रमांक 2 मधील भातगिरणी परिसरात नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीनुसार नाली दुरुस्तीचे (Repairing) काम सुरू करण्यात आले आहे.
या कामाचा शुभारंभ भाजपाचे शहर महामंत्री हर्षल गेडाम यांच्या पुढाकाराने करण्यात आला असून, परिसरातील नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उपक्रमामुळे पावसाळ्यात साचणारे पाणी आणि दुर्गंधी यासारख्या समस्यांपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिसर आता स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी राहील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
हर्षल गेडाम – प्रभागाच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व!
भातगिरणी परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून नाली तुंबण्यामुळे त्रस्त होते.
पावसाळ्यात साचलेले पाणी व अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या.
ही परिस्थिती ओळखून हर्षलभाऊ गेडाम यांनी नगर परिषद अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधला आणि नागरिकांची मागणी पूर्ण करण्याचा संकल्प केला.
त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर नाली दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे.
प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवून परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याचा माझा निर्धार आहे यावेळी असे ते बोलले.
भातगिरणी परिसरात नाली दुरुस्तीचं काम सुरू झाल्याने महिलांनी, युवकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केलं.


0 Comments