समाजसेविका शितल सोमनानी यांची दवाखान्यात रुग्णाला मदत
गडचिरोली : घोट गावातील मुलीला (सुरेश गदेकार याची बहिण) रक्ताची गरज होती. माहिती मिळताच समाजसेविका शितल भोलुभाऊ सोमनानी आणि त्यांच्या टीमने लगेच दवाखाना गाठला. रुग्णाला रक्ताची गरज होती. शितल सोमनानी यांनी आपल्या टीम मधील शाहरुख शेख याला रक्त देण्यात सांगितले. शाहरुख शेख यांनी त्वरित रुग्णाला रक्त दिले. या सेवेमुळे आता रुग्णाची प्रकृती ठीक आहे.
सगळीकडे समाजसेविका शितल सोमनानी आणि त्यांच्या टीमच्या कार्यामुळे घोट - सुभाषग्राम क्षेत्रात सामाजिक कार्याची चर्चा होऊ लागली.
यावेळी समाजसेविका शीतल सोमनानी, शाहरुख शेख, अर्पित दुधबावरे, संकेत कुनघाडकर, वेद गेडाम, साहिल किरमे, आणि घोट क्षेत्रातील युवा टीम व शितल सोमनानी फॅन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते.


0 Comments