गडचिरोली :- सायकल स्नेही मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने प्रदूषणमुक्त भारताचा संदेश देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधून जनजागृतीसाठी “सायकल तिरंगा यात्रा” चे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा मंगळवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता इंदिरा चौक येथून सुरू होईल.
यात्रेचा मार्ग असा असेल - इंदिरा चौक - पटेल सायकल स्टोर्स - आठवडी बाजार - कारगिल चौक - विश्रामगृह, इंदिरा चौक. संपूर्ण यात्रा सुमारे एका तासात पूर्ण होणार आहे.
या यात्रेत वसंत विद्यालय, महिला महाविद्यालय, विद्याभारती कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, राणी दुर्गावती कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांसह शाळा/महाविद्यालयांमधील प्रत्येकी ५० विद्यार्थी, असे एकूण ३०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याशिवाय सायकल प्रेमी नागरिकांनाही सहभागी होण्याचे आवाहन सायकल स्नेही मंडळाचे संस्थापक ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर,अध्यक्ष प्रा. विलास पारधी, उपाध्यक्ष उपेंद्र रोहनकर, प्रा. सुनीता साळवे, सचिव उदय धकाते, सहसचिव योगिता दशमुखे, विजय साळवे, सुचिता धकाते,प्रा. अरुण पालारपवार, उपेंद्र रोहणकर, विलास निंबोरकर, सुचिता कामडी, मीरा बिसेन,विनायक साळवे, पुरुषोत्तम ठाकरे,प्रा.ज्ञानेश्वर धकाते,.डॉ. चंद्रकांत लेनगुरे,योगिता दशमुखे,माधुरी बोरकर,किशोर पाचभाई,डॉ. शिल्पा कोहळे यांनी केले आहे.
0 Comments