Ideas

प्रमोद पिपरे यांच्याकडे लोकसभा निवडणूकीची मोठी जबाबदारी ! चिमूर- गडचिरोली लोकसभा क्षेत्र समन्वयकपदी नियुक्ती
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांची गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राच्या व त्या अंतर्गत येणाऱ्या ६ विधानसभा क्षेत्राच्या क्षेत्र समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे हे गेल्या ३५ वर्षापासून भारतीय जनता पार्टीत कार्य करीत असून त्यांनी आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी व भाजपचे कार्य व नवनवीन योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. त्यांनी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीत अनेक पदे भूषवली असून जिल्ह्यातील सर्वदूर व दुर्गम भागात पक्षाचे संघटन वाढवून शासनाच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. मागील तीस वर्षातील लोकसभा, विधानसभा , जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद नगरपंचायती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जिल्हाभर प्रवास करून अहोरात्र परिश्रम घेतले आहे . तसेच २०१६ च्या गडचिरोली नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या राजकिय अनुभवातुन २५ सदस्य संख्या असलेल्या नगर परिषदेवर १ नगराध्यक्ष व २३ नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळविली होती हे विशेष.

प्रमोद पिपरे यांच्या भारतीय जनता पार्टी मधील आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या काल दि. २ ऑगस्ट रोजी मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राच्या क्षेत्र समन्वयक पदावर प्रमोद पिपरे यांची नियुक्ती केली आहे.

याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र समन्वयक पदाचे नियुक्ती पत्र देऊन प्रमोद पिपरे यांचा सन्मान करण्यात आला.
त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, खासदार अशोक नेते, चिमुरचे आम. बंटी भांगडिया, आमदार डॉ देवराव होळी,आमदार कृष्णा गजभे, माजी राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम, आमगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजयजी पुराम ,माजी आमदार प्रा. अतुल देशकर , भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांना दिले आहे.

त्यांच्या नियुक्ती बद्दल भाजपचे सर्व जिल्हा महामंत्री , जिल्हा, तालुका पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, महामंत्री, शहर अध्यक्ष, व सर्व मोर्चा, आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments