Ideas

सुरजागडच्या 'त्या' दुदैवी घटनेबद्दल कंपनी व्यवस्थापनाने व्यक्त केल्या शोकसंवेदना ! तीन अभियंत्यांचा मत्यू तीन कामगारही जखमी




एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर लोहखनिज भरलेला टिप्पर बोलेरो वाहनावर कोसळल्याने तीन अभियंत्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार ६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत सुरजागड आयर्न माईन्सचे कार्यकारी संचालक एस. व्यंकटेश्वरम यांनी प्रेसनोट जारी करून घडलेल्या घटनेवर दुःख व्यक्त केला आहे. तीन अभियंत्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ओमप्रकाश (२८) रा. झारखंड, नसिंह राणा (२६) रा. ओरीसा व सोनल रामगिरीवार (२६) रा. आलापल्ली अशी अपघातात मृत्यू पावलेल्या अभियंत्याची नावे आहेत. तसेच या अपघातात कन्नीलाल तिग्गा रा. हेडरी, परमेश्वर बेरा व नबोकुमार बेरा रा. दोघेही झारखंड हे कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कंपनी व्यवस्थापानाने दिलेल्या माहितीनुसार सुरजागड पहाडीवर लोहखनिज उत्खननाचे काम सुरू आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यावर एका टिप्परने मुरूम टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी तीन अभियंते बोलेरो वाहनाने पहाडीकडे जात होते. टिप्पर मुरूम टाकत असल्याने ते थांबले. दरम्यान लोहखनिज भरलेला टिप्पर पहाडीवरून खालच्या दिशेने येत होता. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने टिप्पर बोलेरो वाहनावर कोसळला. या अपघाता बोलेरो वाहनाचा चुराडा होऊन वाहनात बसलेले तिन्ही अभियंता ठार झाले. या दुदैवी घटनेबाबत कंपनी प्रशासनाने शोक व्यक्त केला असून कंपनीचे मुख्य संचालक बी. प्रभाकरन यांनी मृताच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. घडलेल्या अपघाताच्या दुदैवी घटेमुळे कंपनीने काही काळासाठी काम बंद ठेवले होते.

Post a Comment

0 Comments