गडचिरोली :- दि. 6 एप्रिल
भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने सोनापूर कॉम्प्लेक्स, विसापूर व हनुमान वार्डातील बुथ क्र. 117,118, 119, 121, 122 व बुथ क्र 105 या बुथावर भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत भाजपचा ध्वज फडकवून भाजपचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शहर महामंत्री तथा शक्ती केंद्र प्रमुख केशव निंबोड, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, विस्तारक जनार्धन साखरे, महिला ओबीसी आघाडी च्या शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, शहर सचिव निताताई बैस, शहर महामंत्री वैष्णवी नैताम, विलास नैताम, उपेंद्र रोहनकर, विनायक बोन्द्रे, बुथ क्र 122 चे बुथ प्रमुख दिनकर बानबले, मंगला कोटगले, भारती शेंडे, धनश्री शिवणकर, वर्षा धकाते, मिनाक्षी नाईक, किरण सहारे, अश्विनी पारेकर, कुमेश्वरी पवार, रुपाली खांडरे, पिंकी हजारे व अन्य नागरिक, महिला उपस्थित होते.
0 Comments