Ideas

स्व. सुषमा स्वराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन्मानचिन्ह देऊन नवेगाव, मुडझा व पुलखल येथील होतकरू महिलांचा सन्मान
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचा उपक्रम

गडचिरोली :- दि. 15 मार्च
    भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने भाजपच्या महिला आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या पुढाकाराने आज दि. 15 मार्च रोजी गडचिरोली तालुक्यातील नवेगाव, मुडझा व पुलखल येथील विधवा, निराधार व होतकरू महिलांच्या घरी जाऊन त्यांना स्व. सुषमा स्वराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
   याप्रसंगी महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात  व पुढाकाराने भाजपच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, रुमनबाई ठाकरे, शहर सचिव नीताताई बैस, शहर उपाध्यक्ष पूनम हेमके यांनी नवेगाव, मुडझा व पुलखल येथे निराधार महिलांच्या घरी जाऊन त्यांना स्व. सुषमा स्वराज  यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
      यावेळी नवेगाव येथील शालू संजय तुनकलवार, सविता बबलू गिरी, मुडझा येथील सुषमा वामन निकुरे, कमलबाई वासुदेव चौधरी तसेच पूलखल येथील मनिषा मोजेंद्र ठाकरे व ललिता नामदेव कोटगले या निराधार कर्तबगार स्त्री शक्तींचा स्व. सुषमा स्वराज यांचे सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी गावातील महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments