Ideas

गडचिरोली होमगार्ड पथकाच्या वतीने 76 वा वर्धापनदिन मोठ्या उत्सहात साजरा



होमगार्ड दिन 76 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांचे आयोजन

              गडचिरोली 11 डिसें.: शहरात होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या ७६ व्या वर्धापन दिन ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आज रविवार दि.11डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या ६ डिसेंबर रोजी ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली होमगार्ड जिल्हा समादेशक यांच्या आदेशानुसार व तालुका समादेशक रवींद्र गायकवाड यांचे नेतृत्वात गडचिरोली शहरात होमगार्ड जनजागृती रॅली काढून सेमना देवस्थान येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सेमाना देवस्थान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


यानंतर वर्धापान दिनाच्या औचित्य साधून पथकातील सेवानिवृत्त मानसेवी अधिकारी व सैनिकांचे शाल श्रीफळ,सन्मानचीन्न देवून सत्कार करण्यात आला.

त्यांच प्रमाणे होमगार्ड कर्मचारी यांना होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या त्यांचे कर्तव्य जबाबदारीचे योगदान यांची जाणीव मार्गशनातून करण्यात आले.

तालुका समादेशक होमगार्ड व नागरी संरक्षण दललाचे कर्तव्य व जबाबदारीचे योगदान यांची जाणीव त्याबाबत मार्गदर्शन तालुका समादेशक अधिकारी गडचिरोली यांनी केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महिला सहायक पोलीस निरीक्षक पूनम गोरे,उदघाटक, तालुका समादेशक रवींद्र गायकवाड,प्रमुख अतिथी ठाकरे सर,वरिष्ट पलटण नायक संजय बोरसरे,सत्कारमूर्ती माजी तालुका समादेशक अधिकारी पेशेंट्टीवार सर,माजी पलटण नायक सातपुते सर, माजी होमगार्ड सैनिक दिलीप येवले, गुरूदास सोनूले, आशाबाई पाथरडे,उषा मेश्राम,गोपिका रामटेके,यांच्यासह अनेक होमगार्ड सैनिक उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता, मुरलीधर पगडपलीवार,पुरुषोत्तम नंदेश्वर,गुणाजी मेश्राम,महेंद्र मेश्राम,भगवान शहारे, राहुल शामकुडे,गुरुदेव भुरसे,हरिदास उंदीरवाडे,बालाजी मेश्राम,प्रफुल ठाकरे,दिपक बोलीवार,मंगला कांबळे, चंद्रकला नरोटे,व होमगार्ड सैनिक यांनी पार पाडले, यावेळी कार्यक्रमाप्रसंगी गडचिरोली पथकातील महिला व पुरुष होमगार्ड सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होमगार्ड सैनिक रुमाजी भुरले, तर आभार संजय बोरसरे,यांनी मानले.


Post a Comment

0 Comments