Ideas

नागपूर येथे ३६व्या MEMC सप्ताहाचे आयोजन

राईट टाईम न्यूज


नागपूर, ४ जानेवारी २०२६: नागपूर येथील हॉटेल रीजेंटा येथे ३६व्या मायन्स एन्‌व्‌हायर्नमेंट अँड मिनरल कन्झर्व्हेशन (MEMC) सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील खाण उद्योगाशी संबंधित विविध भागधारक सहभागी झाले असून पर्यावरण संरक्षण, शाश्वत खाणकाम आणि खनिज संवर्धनासंदर्भातील उपक्रम व उत्तम पद्धतींचे सादरीकरण करण्यात आले. हा वार्षिक कार्यक्रम भारतीय खान ब्युरो (IBM) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जातो.

या प्रतिष्ठित कार्यक्रमात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांच्या सुरजागड आयर्न ओअर माइन्सने फुली-मेकनाइज्ड ओपन कास्ट् माइन्स या श्रेणीत संयुक्त द्वितीय पुरस्कार पटकावला. हा सन्मान अल्ट्राटेक सिमेंटच्या नाओकारी लाइमस्ट्रोन माइन्ससोबत संयुक्तपणे प्रदान करण्यात आला. कंपनीच्या वतीने हा पुरस्कार LMEL च्या महिला टीमने स्वीकारला, जो खाण क्षेत्रातील समावेशक सहभागाची महत्त्वपूर्ण दखल ठरला. या प्रसंगी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय खान ब्युरोचे अधिकारी तसेच विविध खाण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने सक्रिय सहभाग नोंदवत शाश्वत व जबाबदार खाणकामाबाबतची आपली कटिबद्धता दर्शवणारे विविध उपक्रम सादर केले. यामध्ये ग्रीन माइनिंग पद्धती, बैंडेड हेमेटाईट क्वार्टझाईट (BHQ) चे बेनिफिशिएशन, स्लरी पाइपलाईन प्रकल्प, पेलेट प्लांट संचालन तसेच विविध कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांचा समावेश होता.

LMEL च्या सहभागाचे एक विशेष आकर्षण म्हणजे त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आत्म‌विश्वासपूर्ण संवाद. महिला टीमने आपल्या कामाचा आणि व्यावसायिक अनुभवांचा आढावा सादर केला. खाण उद्योगात समावेशकता आणि विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

टीमच्या यशाबद्दल अभिनंदन करत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांनी कंपनीच्या हरित, स्वच्छ आणि शाश्वत खाणकामाच्या दृष्टीकोनाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. राष्ट्रीय पातळीवर लॉयड्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले तसेच महिला सक्षमीकरणाबाबत कंपनीची सततची बांधिलकी पुनः अधोरेखित केली.

बॉक्स आयटमः LMEL च्या सुरजागड आयर्न ओअर माइन्सला मिळालेले पुरस्कार

वरील सन्मानाव्यतिरिक्त, ३६व्या MEMC सप्ताहात लॉयड्स मेटल्स अॅड एनर्जी लिमिटेडच्या सुरजागड आयर्न ओअर माइन्सने विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी पुढील पुरस्कार प्राप्त केलेः

कमी दर्जाच्या खनिजांचे बेनिफिशिएशन व उपयोगः प्रथम पुरस्कार

वनीकरणः प्रथम पुरस्कार

शाश्वत विकासः द्वितीय पुरस्कार

पद्धतशीर व शास्त्रीय विकासः तृतीय पुरस्कार

एकूण कामगिरी (ओव्हर ऑल): द्वितीय पुरस्कार

हे सर्व पुरस्कार शाश्वत खाणकाम पद्धती, पर्यावरण संरक्षण आणि जबाबदार संसाधन व्यवस्थापनात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा पुष्टी करतात.

Post a Comment

0 Comments