राईट टाईम न्यूज
धानोरा:-
रीडवाई गावातून मलेरिया रुग्णास उपचारासाठी मुरुमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना ॲम्बुलन्सचा भीषण अपघात झाल्याची घटना रिडवाई–मुरूमगाव रोडवरील पुलाजवळ घडली. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे.
माहितीनुसार, रीडवाई गावातील दोन ते अडीच वर्षांची मलेरिया बाधित मुलगी उर्फिता कोराम हिला तिची आई सोनी आशिष कोराम यांच्यासह ॲम्बुलन्स क्रमांक MH 33 T 1716 (महिंद्रा कंपनी) मधून मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जात होते. दरम्यान ॲम्बुलन्स चालक विलास उसेंडी हा दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याने रीडवाही ते मुरूमगाव रोडवर वाहनावरील ताबा सुटून ॲम्बुलन्स रस्त्याच्या पलीकडे पलटी झाली.
या अपघातात रुग्ण व तिच्या आईला किरकोळ दुखापत झाली असून दोघांवर मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता काही पत्रकारांकडून उद्धट वागणूक दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. तसेच जनसेवा वैद्यकीय अधिकारी व दवाखान्यातील कर्मचाऱ्यांकडून या घटनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
दारूच्या नशेत ॲम्बुलन्स चालविणे हे गंभीर प्रकार असून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या चालकावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. योग्य वेळी अपघात नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.!


0 Comments