राईट टाइम न्यूज
गडचिरोली : नगरपरिषदेच्या श्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा, रामनगर येथे ३० डिसेंबर रोजी नातवंडांना घेण्यासाठी नेहमीप्रमाणे शाळेत आलेल्या एका वृद्ध आजोबांना अचानक अर्धांगवायूचा झटका आला. मात्र, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या तत्काळ मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.
परीक्षित सतीश येरेकर या विद्यार्थ्याचे आजोबा कवडू भोजराज येरेकर (६६, रा. रेड्डी गोडाऊन चौक, गडचिरोली) हे शाळेत आले होते. मात्र, प्रकृती अस्वस्थ्यानंतर ते जमिनीवर बसले. ही बाब लक्षात येताच मुख्याध्यापक सुधीर गोहणे, शिक्षक महेंद्र शेडमाके, सूर्यकांत मडावी यांनी तत्काळ धाव घेतली. वाहनाची व्यवस्था करत रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच प्रकृती स्थिर आहे.


0 Comments