Ideas

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशा सहित डीबीटी चे पैसे त्वरित द्या : अन्यथा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे जनआंदोलन




गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने शासकीय आश्रम शाळा चालवल्या जातात या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांसह शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येत असते मात्र यावर्षी अजून पर्यंत गणवेश उपलब्ध करून देण्यात आले नाही. विशेष बाब म्हणजे शासकीय आश्रम शाळांमध्ये निवास व भोजनाची व्यवस्था असल्यामुळे येथे स्वयंपाकासाठी मनुष्यबळ कर्मचारी असणे आवश्यक आहे मात्र अनेक शाळांमध्ये यासाठी लागणारा मनुष्यबळ कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत पदाधिकाऱ्यांनी संवाद साधले असता त्यांनी सांगितलं की गडचिरोली जिल्ह्यातील एकूण आश्रम शाळा पैकी फक्त आठ शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे उर्वरित 17 शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून अजूनही वंचित आहेत शालेय स्तरावर काही विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खाते व इतर आधार अपडेटच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी वंचित आहेत. अशी माहिती समोर आली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली आदिवासी जिल्ह्याचे पालकमंत्री असून सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांना विविध समस्या आणि अडचणींपासून सामोरे जावे लागत आहे. शैक्षणिक सत्र सन 25 26 उत्तरार्धात येऊन सुद्धा विद्यार्थ्यांना अजून पर्यंत गणवेश मिळाला नाही गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारून सुद्धा देवेंद्रजी फडणवीस इथल्या समस्या सोडवू शकत नसतील तर महाराष्ट्राच्या समस्या कशा सोडवणार अशी टीका गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड यांनी केली आहे. आदिवासी मंत्र्यांनी या विषयावर तातडीने लक्ष देऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावा अशी मागणी निवेदनातून गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसने केली आहे. करिता गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात यावे अन्यथा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे मोठ्या जण आंदोलन उभारण्यात येईल असे निवेदन संबंधित अधिकारी वहिद शेख सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग गडचिरोली यांना देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, गडचिरोली नगर परिषदेचे नवनियुक्त नगरसेवक श्रीकांत देशमुख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, शहराध्यक्ष विवेक घोंगडे, अमित तलांडे, लालाजी सातपुते, अनिकेत राऊत, अभिजित धाईत, गौरव येणप्रेड्डीवार,  कुणाल ताजने, आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments