पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री श्री गीतेश चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली
दिनांक: २१ डिसेंबर २०२५
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आगामी ५४वे प्रांत अधिवेशनाच्या अनुषंगाने अधिवेशन स्वागत समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत अधिवेशनाच्या तयारी संदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत अधिवेशनाचे स्थान, नियोजन व संपूर्ण विदर्भातून येणाऱ्या छात्रशक्तीसाठी आवश्यक व्यवस्था, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी अधिवेशनाच्या स्वागत समिती व व्यवस्था समितीचा परिचय करून देण्यात आला. यात स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून मा.आमदार डॉ. मिलिंद नरोटे (आमदार गडचिरोली विधानसभा) यांची घोषणा करण्यात आली व स्वागत समितीचे सचिव म्हणून जिल्ह्यातील प्रतिष्ठित उद्योजक व अभाविप चे पूर्व कार्यकर्ते गोविंद सारडा यांची घोषणा करण्यात आली तसेच स्वागत समितीच्या इतर सदस्याची सुद्धा घोषणा करण्यात आली.
आगामी अधिवेशनाच्या व्यवस्थेच्या दृष्टीने खऱ्यावयाची व्यवस्था व नियोजन याबाबत स्वागत समितीचे सचिव
गोविंद सारडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री व विदर्भ प्रांत मंत्री सुश्री पायल कीनाके यांनी अधिवेशनाचे स्वरूप व त्यात होणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच हे वर्ष भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सार्धशती वर्ष म्हणून साजरे होत असून, अधिवेशनाच्या परिसराला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अभाविपचे वाढते काम व त्यात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व आगामी विद्यार्थी परिषदेच्या कार्य संदर्भात पश्चिम क्षत्रिय संघटन मंत्री श्री.गीतेश चव्हाण यांनी सांगितले.
सदर बैठकीत अधिवेशनाच्या निमित्ताने विविध व्यवस्था बद्दल गडचिरोली विभाग संघटन मंत्री राहुल शामकुवर यांनी माहिती दिली व अभाविप विदर्भ प्रांताच्या इतिहासात पहिल्यांदा हे अधिवेशन गडचिरोली येथे होऊ घातला आहेत. त्यामुळे हे अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडण्याचा निर्धार उपस्थित स्वागत समिती व व्यवस्था समितीच्या कार्यकर्त्यांनी केले.
बैठकीचे समारोप अभाविप गडचिरोली नगर अध्यक्ष प्रा. सुनीता साळवे यांनी केले या बैठकीला माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार नामदेव उसेंडी तसेच
या सर्व प्रांत पदाधिकारी, तसेच अभाविप चे पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments