Ideas

हजारो युवक - युवतीना मिळणार मोफत कौशल्य प्रशिक्षण

गडचिरोली : जंगल, खनिजसंपत्तीसाठी परिचित गडचिरोली आता कौशल्य व औद्योगिक प्रगतीचे नवे केंद्र ठरणार आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने ११ डिसेंबरला 'लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप' (LMGSE) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करून कौशल्याधारित प्रशिक्षणाची सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात ३०० बेरोजगारांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने १० हजार युवकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे.

शहराजवळील बोदली येथे लॉयडस् मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण यांच्या हस्ते, तसेच अल्का मिश्रा, LICLचे व्यवस्थापकीय संचालक व्यंकटेश संधील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा उपक्रम गडचिरोलीतील युवकांसाठी अभूतपूर्व संधी निर्माण करणार आहे. या माध्यमातून गरजू व होतकरू बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल.
चार हजार जणांना जड वाहने चालविण्याचे प्रशिक्षण

२० दिवसांच्या या प्रशिक्षणात ४५ दिवस क्लासरूम ट्रेनिंग आणि ४५ दिवस ऑन-जॉब ट्रेनिंगचा समावेश आहे. याशिवाय महिलांसाठी खास थ्री-व्हीलर ड्रायव्हिंग कोर्सेसद्वारे प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे. एकूण ४,००० पेक्षा अधिक प्रशिक्षित व्यावसायिक ड्रायव्हर्स तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

उद्योगमान्य प्रशिक्षण दिले जाणार

बांधकाम (बार-बेंडिंग, शटरिंग, मेसनरी), मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल, अक्षय ऊर्जा, ऑटोमोबाइल सर्व्हिस, लॉजिस्टिक्स सपोर्ट, सेवा क्षेत्र, प्रत्येक प्रशिक्षणासोबत उद्योगमान्य प्रमाणपत्रे आणि रोजगाराची थेट जोडणी दिली जाणार आहे.
अंतर्गत वेल्डिंग, प्लंबिंग, ट्रान्सपोर्ट, बार-बेंडिंग, शटरिंग अशा महत्त्वाच्या कौशल्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यातून गडचिरोलीतील युवकांना देश-विदेशातीत रोजगारसंधींशी थेट जोडले जाणार आहे. जमशेदपूरपेक्षाही मोठी स्टील सिटी गडचिरोलीत उभारण्याचे माझे स्वप्न आहे.

बी. प्रभाकरण, व्यवस्थापकीय संचालक लॉयडस मेटल्स

Post a Comment

0 Comments