शितल सोमनानी यांची डॉ. पेंदाम यांच्याशी चर्चा..
गडचिरोली : - गडचिरोली येथील महिला रुग्णालयातून एका रुग्णास रक्ताची अत्यावश्यक गरज असल्याची माहिती समाज सेविका शीतलताई सोमनानी यांना प्राप्त झाली. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ प्रतिसाद देत त्यांनी संबंधित रुग्णाशी संपर्क साधला.
आणि समाज सेविका शीतल सोमनानी व त्यांची टीम स्वप्नील पोगुलवार, संचित येनगंटिवार, अर्पित दुधबावरे, प्रमोद सातार, अभिषेक गुरनुले, संकेत कुनघाडकर, वेद गेडाम व इतर कार्यकर्ते यांनी रुग्णालयात जाऊन तातडीने मदतकार्य केले.
घोट येथील वैशाली तरस्कर ही महिला पेसेंट डिलिवरी (प्रसूती) साठी महिला रुग्णालयात दाखल झाल्या होत्या आणि त्याचं सिजर असल्यामुळे त्यांना रक्ताची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे सदर पेशंट महिलेला तात्काळ उपचार सुरू व्हावा यासाठी शितल सोमनानी यांनी महिला रुग्णालय गडचिरोली येथे एम एस डॉ. पेंदाम महिला रुग्णालय गडचिरोली यांच्याशी सविस्तर चर्चा करून सदर पेशंट बद्दल माहिती देण्यात आली व परिस्थितीची पाहणी करून वैद्यकीय अधिकारी व रुग्णा सोबत चर्चा करण्यात आली. आणि संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना धीर देत त्यांना आधार दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे रक्ताचा प्रश्न मार्गी लागला व रुग्णास आवश्यक ती मदत वेळेत मिळाली.
या कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील कार्यामुळे समाजात समाजसेविकेच्या कार्याची प्रशंसा होत आहे.


0 Comments