सरपंच रुपाली दुधबावरे यांनी घेतला पुढाकार
घोट : येथील रहिवासी विजय शंकर पुलीवार (वय ४०) हे काही काळापासून कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे.
ही बाब घोट ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली दुधबावरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ती समाजसेविका शीतल सोमनानी यांना कळविली.
समाजकार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या शीतलताईंनी तत्काळ मदतीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि गरजू कुटुंबाला आवश्यक ती आर्थिक मदत पुरविण्यासाठी सहकार्य केले.
सरपंच रुपाली दुधबावरे यांनी स्वतः रुग्णाच्या घरी भेट देऊन त्यांची विचारपूस केली व शीतलताईंचा संदेश आणि मदत पोहोचवली.
त्यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते आणि सर्वांनी या सामाजिक कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.
शीतल सोमनानी या यापूर्वीही अनेक गरीब, निराधार आणि रुग्णांना औषधोपचार, रक्तदान आणि सामाजिक उपक्रमांद्वारे मदत करत आल्या आहेत.
त्यांच्या कार्यामुळे समाजात मानवतेचा आणि प्रेरणेचा संदेश पोहोचत आहे.
स्थानिक नागरिक म्हणाले कि, शीतलताई समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मदतीसाठी तत्पर असतात. राजकारणापेक्षा समाजसेवा हेच त्यांचं खऱ्या अर्थाने ध्येय आहे.
घोट परिसरात शीतल सोमनानी यांच्या या कृतीचं विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या समाजसेवेच्या कार्यामुळे समाजात एकतेचा, मानवतेचा आणि सेवाभावाचा संदेश पसरला आहे.


0 Comments