भारतीय जनता पार्टी गडचिरोली व माधव नेत्रालय नागपूर यांच्या वतीने इंदिरानगर येथे मोफत नमो नेञ तपासणी व चष्मे वाटप शिबिर
246 नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोली व माधव नेत्रालय नागपूर यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर व नेत्रदान जनजागृती शिबिराचे आयोजन
शहरातील स्थानिक इंदिरानगर येथे आयोजन करण्यात आले. शहरातील व जिल्हातील प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोचविणे हिच खरी जवाबदारी असून यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे या शिबिरातून नेञदाण जनजागृतीचा एक नवा संदेश समाजात पोहचेल असा विश्वास शहर अध्यक्ष भाजपा अनिल कुनघाडकर यांनी व्यक्त केला
हे शिबीर बुधवार दिनांक 15/10/2025 रोजी सकाळी 8 वाजता पासून सुरू होवून 5 पर्यंत चालले या मोफत भव्य शिबिराचा बहुसंख्य सर्व वयोगटातील महिला,मूली, पुरूष, मूले सर्व नागरिकांनी लाभ घेतला नागरिकांच्या निरोगी आरोग्य संवर्धनासाठी या शिबिरात विशेष मोफत नेञ तपासणी व नेत्रदान जनजागृती करण्यात आली.
या शिबिराचे उद्दिष्ट सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य संर्वधनासोबत निरोगी जीवनशैली तसेच नेञदाण जनजागृती करणे हा आहे.
माधव नेत्रालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेञ तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये मोफत आधुनिक उपकरणाद्वारे तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले बहुसंख्य मोतीबिंदू व डोळ्याचे इतर आजार आढळले त्यांच्या जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे माधव नेत्रालय नागपूर द्वारा मोफत उपचार व ऑपरेशन करण्यात येणार आहे
यावेळी रमेश भुरसे प्रदेश सदस्य किसान आघाडी. गोविंद सारडा जिल्हा महामंत्री . गीता हिंगे जिल्हा महामंत्री. मधुकर भांडेकर जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा दत्तू सूत्र पवार तालुका अध्यक्ष. सीमा कन्नमवार शहराध्यक्ष महिला आघाडी. वर्षा शेडमाके जिल्हा सचिव. भारती खोब्रागडे शहर उपाध्यक्ष.भूमिका बर्डे शहर महामंत्री महिला आघाडी.शहर महामंत्री हर्षल गेडाम, विनोद देवोज्जवार,सुरज गुंडमवार , मयूर कुनघाडकर समस्त नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते
0 Comments