Ideas

सिरोंच्यात जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न


प्रशासनातील पारदर्शकतेसाठी माहिती अधिकाराचे महत्व अधोरेखित

सिरोंचा : पंचायत समिती सिरोंचा येथे जागतिक माहिती अधिकार दिनलमोठ्या उत्साहात आणि जनजागृतीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी “ माहिती अधिकार कायदा – नागरिकांचा अधिकार, प्रशासनाची जबाबदारी ” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश नागरिकांना माहिती अधिकार कायद्याचे महत्व पटवून देणे आणि ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला शासनाची माहिती सहज, पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धतीने उपलब्ध करून देणे हा होता. या प्रसंगी अतिदुर्गम भागातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, पेसा मोबिलायझर, जनमाहिती अधिकारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण पातळीवर नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत परिणामकारक ठरला.
कार्यक्रमाचे प्रमुख प्रशिक्षक जिल्हा अध्यक्ष – माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे  मनोज उराडे होते. त्यांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनातून माहिती अधिकार कायद्याची उत्पत्ती, त्याचे महत्व, योग्य वापर आणि प्रशासनातील पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित करण्यातील भूमिकेवर सविस्तर प्रकाश टाकला.  उराडे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “प्रत्येक नागरिकाने आपले हक्क जाणून घेतले पाहिजेत आणि पारदर्शक प्रशासनासाठीमाहिती अधिकार हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल कडुकर (पेसा बी.एम.) यांनी उत्साहपूर्णरीत्या केले, तर आभार प्रदर्शन  देवेंद्रकुमार रंगू , तालुका अध्यक्ष – माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती यांनी केले. त्यांनी सर्व मान्यवर, अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी *गटविकास अधिकारी सुखीराम कस्तुरे आणि सहाय्यक गटविकास अधिकारी  बन्सोड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी एकमुखाने मत व्यक्त केले की अशा जनजागृती उपक्रमांमुळे ग्रामीण प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख होण्यास निश्चितच बळ मिळेल.

Post a Comment

0 Comments