Ideas

विद्यार्थ्यांनी आदर्श जीवनमूल्यांची प्रेरणा घेतली पाहीजे - प्राचार्य उदय थुल


             धानोरा : येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली व्दारा-संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष स्मृतिशेष शिक्षण महर्षी प्राचार्य स्व रमेशचंद्रजी मुनघाटे यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्य विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यांत आले.
         याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्धानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय थुल विचारपीठावर उपस्थित होते तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ विणा जम्बेवार डॉ हरीष लांजेवार डॉ राजू किरमीरे डॉ गणेश चुदरी व्यासपीठावर उपस्थित होते.
         कार्यक्रमाची सुरूवात स्व रमेशचंद्रजी मुनघाटे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीपप्रज्वलनाने करण्यांत आली.सदर पुण्यतिथीच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमा अंतर्गत परिसर स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, आणि रूग्णांना फळवाटप करण्यांत आले. यावेळी अतिशय भावपूर्ण वातावरणात सामुहिक आदरांजली अर्पण करूण्यांत आली. प्रसंगी प्राचार्य डॉ उदय थुल मनोगत व्यक्त करतांना म्हणाले "स्व रमेशचंद्रजी मुनघाटे हे आदर्श जीवनमूल्यांचा दीप तेवत ठेवणारे व्यक्तिमत्व होते"विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले व त्यांच्या आठवणींना उजाळा देत आदर्श कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरवपूर्ण स्मरण केला.
        यावेळी डॉ वाघ डॉ चव्हाण डॉ झाडे डॉ मुरकुटे डॉ गोहणे डॉ पठाडे डॉ धवनकर प्रा बनसोड प्रा वाळके डॉ पुण्यप्रेड्डीवार प्रा धाकळे प्रा खोबरागडे प्रा वटक प्रा आवारी प्रा रणदिवे प्रा करमनकर प्रा मांडवगडे प्रा मिनाक्षी खोबरागडे श्री मानापुरे श्री गोहणे श्री लांबट श्री कायते श्री बोंगीरवार श्री नन्नावरे श्री वाढणकर श्री राजगडे  ईत्यादी मंडळी आवर्जृन उपस्थित होती. तसेच ग्रामीण रूग्णालयातील डॉ हेमराज मसराम डॉ सीमा आठमांडे श्रीमती मनिषा झोडापे श्रीमती बबिता मेश्राम श्री डेव्हीड गुरनुले श्री गणेश कुळमेथे यांनी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून मोलाचे सहकार्य केले.
          कार्यक्रमाचे संचालन डॉ गणेश चुदरी प्रास्ताविक डॉ विणा जम्बेवार तर आभार डॉ प्रियंका पठाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभागाचे सर्व स्वंयसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments