---
गडचिरोली : स्वामी विवेकानंद युथ फाउंडेशन, गडचिरोली यांच्या वतीने दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सामाजिक बांधिलकीतून “एक हात मदतीचा” हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत अहिल्यादेवी बालगृह व मातोश्री स्वाधार गृह शक्ती सदन, घोट येथील महिला व मुलींना दिवाळीचा आनंद देण्यासाठी फराळ, ब्लँकेट व मातीचे दिवे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर गडचिरोली येथील वृद्धाश्रमात देखील रहिवाशांना फराळ वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.
या उपक्रमामध्ये संस्थेचे स्वयंसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वैभव संगेवार, मंगेश दुधबावरे, राहुल जुमनाके, प्रसाद गांगरेड्डीवार, सुरज आकरे, दिलीप टिंगुसले, इमरान शेख, अविनाश गुरनुले, प्रवीण मेश्राम, प्रज्वल कोतपल्लीवार, संकेत येनप्रेड्डीवार, शुभम पगडपल्लीवार, आशिष स्वामी, अथर्व कोरडे, श्रीकांत येनगंटीवार, कुणाल मानकर, रुपम निलेकार, खुशबू भांडेकर, गौरी निसार, ममता मेश्राम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाद्वारे समाजातील वंचित घटकांना दिवाळीच्या सणाचा आनंद वाटून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असून सामाजिक जाणीव जागवण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम ठरला.


0 Comments