जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ; प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी
Right Time News Network
गडचिरोली :
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गडचिरोली शहरातील रामनगर येथील पीएम श्री जवाहरलाल नेहरू शाळेला बुधवारी (दि. १७) भेट दिली. या दरम्यान त्यांनी शाळेतील प्रयोगशाळा, वर्गखोल्या, सुरक्षा उपाय, स्वच्छता तसेच शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील इतर शाळांनी या शाळेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
यावेळी उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, शिक्षण विस्तार अधिकारी सहाळा, नगरपरिषद गडचिरोलीचे अभियंता अंकुश भालेराव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक व पालक उपस्थित होते.
नववी व दहावीचे वर्ग सुरू होणार पालकांनी शाळेत इयत्ता नववी व दहावी सुरू करण्याची मागणी केली. त्यासाठी वर्गखोल्या बांधकामाकरिता निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. पालकांच्या देणगीतून झालेल्या नावीन्यपूर्ण बदलांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
0 Comments