Ideas

भाजपा गडचिरोली शहर विस्तारित कार्यकारणीची बैठक संपन्न





      आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्य कार्यालय क्रमांक. 1 येथे सभा

शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर  यांच्या नेतृत्वात बैठकीचे नियोजन

  गडचिरोली शहरातील  नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना  औपचारिकरित्या  
नियुक्तीपत्र प्रधान करण्यात आले.

 दिं  07/ 08/2025

गडचिरोली:  भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर   विस्तारित कार्यकारणी बैठक आज गुरुवार ला दुपारी  1 वाजता आमदार   कर्तव्य कार्यालय क्रमांक . 1 येथे उत्साहात पार पडली.या बैठकीला शहरातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांच्या हस्ते नवनियुक्त कार्यकर्त्यांची नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

या बैठकीला प्रमुख उपस्थिती भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा  क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद जी नरोटे,माजी आमदार डॉ. नामदेवरावजी उसेंडी,प्रदेश किसान  मोर्चाचे सचिव  व जेष्ठ नेते रमेशजी भुरसे,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वागरे,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर,जिल्हा महामंत्री गीता ताई हिंगे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष  व माजी नगराध्यक्ष  योगिता ताई पिपरे, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके,चंदाताई कोडवते,जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भाऊ येनगंदलवार ,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मधुकर भाऊ भांडेकर.

या वेळी डॉ. मिलिंदजी नरोटे मार्गदर्शन करताना मटले कि  पक्षाच्या विचारासाठी काम करणारा कार्यकर्ता हिच पक्षाची   ताकद  आहे, निष्ठावंत कार्यकर्ता कोणत्या एका व्यक्तीसाठी  काम करत  नाही तर तो  पक्षासाठी  काम करतो,  कार्यकर्त्यांची   पार्टी,  कार्यकर्त्यांचा सन्मान करणारी   पार्टी  म्हणून भारतीय  जनता पक्षाचा लौकिक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला पार्टी जबाबदारी देत असते, कार्यकर्त्यांनी केलेली  प्रचंड मेहनत त्यामुळे भारतातच नवे तर जगातील   सर्वाधिक   प्राथमिक सदस्यसंख्या   असलेला पक्ष म्हणजे "भारतीय जनता पक्ष" आहे,  देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास झपाट्याने होत आहे, हा विकासाच्या रथ आल्याला  प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचं आहे व  केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवूया , कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन अधिक मजबूत  करण्यासाठी नियोजनबद्ध कार्य करावे.

 बैठकिस  गडचिरोली शहर   अध्यक्ष अनिलजी कुनघाडकर यांनी प्रास्ताविक केले व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन  पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला,भाजपा गडचिरोली शहरात  अधिक मजबूत होईल व आगामी   येणाऱ्या नगरपरिषद निवडणूकित विजय आपलाच होईल, या बैठकित विविध विषयांवर चर्चा झाली आणि आगामी  कार्याची दिशा ठरविण्यात आली.

बैठकीदरम्यान "हर घर तिरंगा" व रक्षाबंधन या महत्त्वकांक्षी कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन, कार्य विभागणी आणि अंमलबजावणी  याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले,

यांच्यासह शहरातील व मंडळ पातळीवरील  विविध पदाधिकारी, सर्व मोर्चाचे पदाधिकारी व  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments