Ideas

विद्यार्थी हे आपल्या देशाचं भविष्य.! संजय गावडे


संजय गावडे मित्रपरिवार कडून विशेष औचित्य साधत शाळेतील बालगोपाल मित्रांना नोटबुक भेट.

गडचिरोली : 8 ऑगस्ट रोजी संजय गावडे यांचा वाढदिवस असतो. तसेच 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो. या दोन्ही दिनांचे औचित्य साधत काल 5 ऑगस्ट मंगळवारी रोजी मी मुंगनेर, येनगाव, बोदिन, पावरवेल, चिमरीकल, कामनगड, कामथळा, सावंगा (बूज), सावंगा (खुर्द), पेकिनमुडझा, पेंढरी, ढोरगट्टा, पळसगाव, दुर्गापूर, व झाडापापडा आदी गावातील जिल्हा परिषद शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप केले. तसेच आपली दैनंदिन माहिती या नोटबुकमध्ये लिहण्याबाबत मार्गदर्शनही केले. विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे, हा विश्वासही यावेळी व्यक्त केला. यावेळी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन संजय गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाला कुठलाही केक, वगैरे न कापता मी अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तसेच आगामी काळातही संजय गावडे यांनी समाजसेवेसाठी सदैव कार्यरत राहीन असे व्यक्त केले.
    यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद लेनगुरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, पेंढरी चे सरपंच पप्पू येरमे, दुर्गापूरचे ज्येष्ठ नेते छबिलाल बेसरा, कामथळाचे उपसरपंच देवसाय गावडे, मुंगनेर उपसरपंच दयाराम गावडे, बोदीनचे दयाराम गावडे, उपसरपंच महेंद्र उईके, कावळेजी, अभिजीत गाईन, सचिन गावतुरे, दिपाली उसेंडी, आचल किरंगे, त्या त्या शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी आदी उपस्थित होते.
  आजूबाजूच्या गावातील शाळेत वेळे अभावी  नोटबुक पोहचू शकले नाही. त्या त्या शाळेत सोयीनुसार नोटबुक पोहचविले जातील.

Post a Comment

0 Comments