गडचिरोली - कोनसरी :
लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी प्रकल्प आणि सुरजागड लोहखनिज खाण येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. दोन्ही ठिकाणी, गावातील मान्यवर आणि एलएमईएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी या समारंभात सहभागी झाले होते.
कोनसरी प्रकल्पात झालेल्या अतिशय उत्साहपूर्ण कार्यक्रमात कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे हे प्रमुख अतिथी होते. कोनसरी गावातील गणमान्य नागरिक नागोबा पेद्दापल्लीवार, अभिजित बंडावार, कोनसरी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य; एलएमईएल चे वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला, स्थानिक आदिवासी बंधू-भगिनींनी पाहुण्यांचे पारंपारिक स्वागत केले, ज्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. ह्या प्रसंगी प्रकल्प सुरक्षा यंत्रणा, रस्ता सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन आणि सुरक्षा चमू, कॅम्प सेफ्टी या पथकांनी आणि कोनसरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी आणि शिस्तबद्ध संचालन सादर केले. एलएमईएलने छिंदवाडा येथे वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवलेल्या मुलींनीही संचालनात भाग घेतला. यावेळी उपस्थित असलेल्या सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात ह्या चमूंची प्रशंसा केली.
परेडची पाहणी केल्यानंतर, मान्यवरांनी विजेत्यांना विविध स्पर्धांसाठी बक्षिसे प्रदान केली आणि एलएमईएल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित केले.
सुरजागड लोहखनिज खाण येथे झालेल्या कार्यक्रमात गावातील गणमान्य नागरिक आणि एलएमईएल चे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Comments