Ideas

रस्ता बांधकामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करण्याचा योगाजी कुडवे यांचा ईशारा

गडचिरोली (१८) :
सार्वजनिक बांधकाम उपविभाग चामोर्शी अंतर्गत कार्यरत उपविभागीय अभियंता बड्डे यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या रस्ता बांधकामांची चौकशी करावी. तसेच व गडचिरोली या तालुक्यांतील कामांची चौकशी करण्यात करून जबाबदार अभियंत्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा २५ जुलैपासून सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोलीसमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगाजी कुडवे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. 

सन २०२१-२२ व २०२२ २३ ते आजतागायत सार्वजनिक बांधकाम उपविभाग चामोर्शी
अंतर्गत उपविभागीय अभियंता बड्डे यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेली व पूर्ण झालेली रस्ता बांधकामांत ४० ते ५० टक्के कमी दर (बिलो) टाकून कंत्राटदारांनी कामे पूर्ण केली. या कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग चामोर्शी अंतर्गत जामगिरी, गडचिरोली उपविभागातील कारागृह आतील रस्ता बांधकाम व रस्ता, धानोरा तालुक्यातील पेंढरी- जारावंडी रस्ता बांधकाम कमी दराने करण्यात आली आहेत. तसेच हा रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचे डांबर प्लान्ट १०० किमीहून अधिक अंतरावर आहे. नियमानुसार डांबर प्लान्ट ६० किमीच्या आत असणे बंधनकारक आहे. त्यामुळे कमी दर टाकून करण्यात आलेल्या कामांची चौकशी करावी तसेच कामांचे टीडीआरची तपासणी करावी, अशी मागणी कुडवे यांनी केली आहे. 

यासंदर्भात कारवाई न केल्यास सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोलीसमोर २५ जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष योगाजी कुडवे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments