Ideas

राष्ट्रीय महामार्गाची रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावा - खासदार अशोक नेते
जड वाहतुकीच्या त्रासातून गडचिरोलीकरांची होणार सुटका खासदार अशोक नेते यांचे  निर्देश-

गडचिरोली दि.१५ जुन २०२३

गडचिरोली:-  गडचिरोली शहरातून चारही बाजुने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून होणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरातील रहदारीला अडचण लक्षात घेत शहरातून चारही दिशेने महामार्गाचे काम मार्गी लागल्यानंतर वाहतूक वाढली आहे. रस्ता मोठा झाला असला तरी नागरिकांकडील वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
 शिवणी नदीवरील रस्त्यांची दुरूस्ती करा

चामोर्शी मार्गावरील शिवणी नदीवरच्या पुलाला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असल्याने हे काम तातडीने करून नागरिकांची या त्रासातून मुक्तता करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.त्यानुसार चामोर्शी मार्गावरील शिवणी नदीवरील पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचेही काम खासदार महोदयांच्या सुचनेनुसार रस्त्याचे का सुरू झाले व लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.याशिवाय चामोर्शी मार्गावरील रस्ता दुभाजकावरील पथदिवे सुरू करणे, गडचिरोली टी-पॅाईंट ते पोस्ट ऑफिस पर्यंतच्या ड्रेनेज लाईनचे काम तातडीने पूर्ण करणे आणि कंत्राटदार व महावितरण यांच्या समन्वयातून राष्ट्रीय महामार्गावरील विद्युतीकरणाची कामे तसेच वाहनाचा वेग नियंत्रित करण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक उपाय योजना करुन डिव्हायडरचे काम सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांना खा.अशोक नेते यांनी दिले आहेत.
यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी शिवणी पोटफोडी नदीवरच्या बाजुवरील  चालू असलेल्या रस्त्याची पाहणी केली असता सोबत जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments