Ideas

चला जाणूया नदीला अभियानांतर्गत नदी संवाद यात्रेस आमदार डॉ.देवराव होळी यांचे हस्ते सुरूवात



गडचिरोली, दि.15 : चला जाणूया नदीला या उपक्रमातील नदी संवाद यात्रेला जिल्हयात सुरूवात झाली. या संवाद यात्रेचा शुभारंभ जिल्हयात तिनही नदींवर करण्यात येत आहे. यातील कठाणी नदीवरील संवाद यात्रेचा शुभारंभ धानोरा तालुक्यातील सालेभट्टी चिचोली येथे पार पडला. यावेळभ्‍ गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते व उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक व गावकरी यांच्या समन्वयाने उत्स्फूर्तपने करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने देवाजी तोफा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कार्यकारी अभियंता इंगोले सो, कठाणी नदी समन्वयक मनोहर हेपट,  विविध  ग्रामपंचायती प्रतिनिधी, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी,  कृषी विभाग,  जलसंपदा विभाग,  जलसंधारण विभाग व इतर विभाग  यांचा प्रामुख्याने सहभाग लाभला.


कार्यक्रमावेळी आमदार होळी यांनी चला जाणूया नदीला या उपक्रमाचे महत्त्व उपस्थित गावकऱ्यांना समजावून सांगितले. तसेच या संवाद यात्रेत सहभागी होण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले. यानंतर उपवनसंरक्षक शर्मा यांनी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व इतर मान्यवरांनी संवाद यात्रेबाबत माहीती सांगितली. नदी समन्वयक मनोहर हेपट यांनी प्रस्तावनेत कठाणी नदीबद्दल माहिती दिली व संवाद यात्रेची रूपरेषा सांगितली. उद्घाटन कार्यक्रमानंतर जल कलश पुजन करून दिंडी काढण्यात आली. राजोली गावात पदयात्रेचे आयोजन करून उपस्थितांना जल प्रतिज्ञा देण्यात आली. या संवाद यात्रेमधे दि.21 जून पर्यंत विविध गावांमधे जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.


नदी प्रहरी पोहार पोटफोड़ी नदी संवाद यात्रा चला जाणुया नदीला या उपक्रम अंतर्गत 15 जून रोज़ी गोडलवाही पासून शुभारंभ होत असून 21 जून र्यंत उपक्रम सुरू राहणार आहेत. तसेच खोब्रागडी सती नदीसाठीची संवाद यात्राही दि.15 जून पासून सुरू होत आहे.

Post a Comment

0 Comments