Ideas

गडचिरोली वनविभागात खरेदी करण्यात आलेल्या साहित्याची चौकशी करा



 अखिल भारतीय सरपंच परिषदेचा इशारा

गडचिरोली, १६ मे :- शामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत गडचिरोली वनविभागात विविध साहित्य खरेदी करण्यात आले. मात्र या वस्तु खरेदीमध्ये फार मोठी तफावत दिसून येत आहे. तसेच सदर साहित्य संयुक्त वनव्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता साहित्य जबरदस्तीने लादल्या जात आहे. त्यामुळे या साहित्य खरेदीच्या व्यवहाराची चौकशी समितीद्वारे सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य वनसंरक्षकांना निवेदनातून दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत गडचिरोली वनविभागात येणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती अंतर्गत वॉटरबम, इलेक्ट्रक ऑटोरिक्षा, केजविल, रोटावेटर, शेतीचे साहित्य, थ्रेशर मशीन आदींसह इतर साहित्य खरेदी करण्यात आले. मात्र या साहित्य खरेदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे. तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दबाव टाकून मनमर्जीपणे गरज नसताना साहित्य जबरदस्तीने लादत आहेत. त्यामुळे शामाप्रसाद मुखर्जी या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न वन विभागातील अधिकाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे गडचिरोली वनविभागात खरेदी करण्यात आलेल्या संपूर्ण खरेदी व्यवहाराची चौकशी समिती गठित करून चौकशी करावी व दोषी अधिकारी/कर्मचारी यांना 15 दिवसांच्या आत निलंबित करावे. अन्यथा मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक डॉ. मानकर यांना निवेदनातून दिला आहे. यावेळी शिष्टमंडळात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगाजी कुडवे, नीळकंठ संदोकर, रवींद्र सेलोटे, चंद्रशेखर सिडाम, आकाश मट्टामी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments