गडचिरोली, ता. १७ :
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड
जवळच्या हेडरी येथे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालय, सीबीएसई
शाळा आणि शिवणकला केंद्राच्या बांधकामाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला..
लॉयड मेटल्स अँड एनर्जी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश गुप्ता, त्रीवेणी अर्थमूव्हर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय दंडाधिकारी शुभम गुप्ता, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री दडास, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री राठोड, लॉयड फाउंडेशनच्या संचालक कीर्ती रेड्डी, संचालक मधूर गुप्ता यांच्यासह उपसरपंच, माजी सरपंच यांच्यासमवेत कंपनीचे इतर अधिकारी, कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
लवकरच हेडरी येथे इंग्रजी शाळा, सुसज्ज रुग्णालय व शिवणकला केंद्र निर्माण होत असल्याने हेडरी परिसरातील अतिदुर्गम व संवेदनशील भागातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण होईल. शिवाय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली जातील. तसेच शिवणकला केंद्राच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी महिलांना प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होईल. एकूणच आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे प्रतिपादन बी. प्रभाकरन यांनी केले. यावेळी गावातील काही नागरिकांनी मनोगत व्यक्त करताना सुविधा उपलब्ध करुन देत असल्याबद्दल लॉयड कंपनीचे आभार मानले.
0 Comments