Ideas

गडचिरोलीत भाजप- शिवसेने तर्फे 4 एप्रिल ला निघणार स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा





30 मार्च पासून राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रेला झाली सुरुवात

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांची पत्रकार परिषदेत माहिती

 (Gadchiroli) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करुन देण्यासाठी राज्यभरात 30 मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) सुरुवात झाली असून ही यात्रा 6 एप्रिल पर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकराच्या कार्याची ओळख करुन देण्यात येणार आहे. राहुल गांधी व काँग्रेस च्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या कांग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हान या माध्यमातून देण्यात येत आहे.

राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल. 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरुन जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती. या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अशी माहिती काल आयोजित पत्रकार परिषदेत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी (MLA Dr. Devrao Holi) यांनी दिली. तसेच सदर गौरव यात्रा गडचिरोली जिल्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात काढणार असून सदर पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत जंबेवार, भाजप जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगर सेवक न.प. गडचिरोली मुक्तेश्वर काटवे, माजी नगर सेवक न. प. गडचिरोली केशव निंबोड, बोरकुटे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments