Ideas

चामोर्शी तालुक्यातील संकल्पनाधारीत ग्रामपंचायत विकास आराखडा व शाश्वत विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नावाखाली सुरू आहे अनियमितता ...




जाणीवपूर्वक अनुपस्थित कर्मचाऱ्यावर होणारा खर्च स्वतःच्या खिशात टाकण्याचा सबंधित अधिकाऱ्याचा प्रयत्न...

 सबंधित अधिकाऱ्याची चौकशी करा - सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांची मागणी.




गडचिरोली १६ :- गडचिरोली जिल्ह्यातील
 चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत चालू असलेल्या संकल्पनाधारित ग्रामपंचायत विकास आराखडा
 व शाश्वत विकास ध्येयांच्या प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असून दि. १४ मार्च पासून राज्यात राज्यव्यापी कर्मचाऱ्यांचे संप सुरू आहे. त्या संपामध्ये ग्रामसेवक , शिक्षक , मुख्याध्यापक , आरोग्य अधिकारी / कर्मचारी व इतर
 विभागातील कर्मचाऱ्यांनी  सहभाग नोंदवलेला आहे. असे असताना चामोर्शी तालुक्यामध्ये
 एकूण १० गण आहेत, त्या संपूर्ण गणात एकूण ७५ ग्रामपंचायत आहेत .
सदर सुरू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी / कर्मचारी हे संपात सहभागी असल्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रमाचा कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही . 
सबंधित जे कोणी अधिकारी प्रशिक्षण घेत आहे  त्या अधिकाऱ्याला दिनांक १४/३/२०२३ पासून राज्य कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे हे माहीत असूनही जाणीवपूर्वक अनुपस्थित कर्मचाऱ्यावर होणारा खर्च स्वतःच्या खिशात टाकण्याचा प्रयत्न दिसत आहे.

जर प्रशिक्षणामध्ये सन २०२३ - २०२४ ग्रामपंचायत विकास आराखडा नियोजन संदर्भात प्रशिक्षण आहे मग शासकीय कर्मचारीच प्रशिक्षणात हजर नसल्यामुळे प्रशिक्षणाचा फायदा काय असा प्रश्न पडतो आहे? व विकास आराखड्याची अंमलबजावणी करणार कोण ? याची जबाबदारी प्रशिक्षण घेणारा अधिकारी 
घेणार का हा गहन प्रश्न पडतो आहे. प्रशिक्षणाच्या नावाखाली चामोर्शी तालुक्यातील खेळखंडोबा सुरू आहे.
याची योग्य चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments