Ideas

इंदिरानगर येथील रात्रकालीन टेनिस क्रिकेट स्पर्धेत गडचिरोली व मूल च्या संघाची अंतिम सामन्यात धडक



    आज मुल व गडचिरोली संघात अंतिम सामना व बक्षीस वितरण कार्यक्रम

गडचिरोली :- दि 5 जाने.  

    अनुराग पिपरे फ्रेंड्स क्लब गडचिरोली व जय दुर्गा उत्सव मंडळ एकता चौक इंदिरानगर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 डिसेंबर पासून सुरु झालेल्या रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून काल दि. 4 जानेवारी 2023 रोजी झालेल्या सेमी फायनल च्या सामन्यांमध्ये मुल संघाने नितीन गेडाम क्रिकेट संघ गडचिरोली चा पराभव केला तर जय बजरंग संघ, गडचिरोलीने इंदिरानगर क्रिकेट संघाचा पराभव करीत अंतिम सामन्यात धडक दिली. आज दि 5 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मुल क्रिकेट संघ व जय बजरंग संघ गडचिरोली यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे


   काल झालेल्या उपांत्य सामन्यात नितीन गेडाम संघाने 8 षटकात 55 धावा उभारल्या तर मुल संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावा करीत अंतिम फेरीत धडक दिली तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंदिरानगर संघाने दिलेले 33 धावांचे आव्हान जय बजरंग संघाने 6 षटकात पूर्ण करून बाजी मारली. तसेच तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत नितीन गेडाम संघाने इंदिरानगर संघाचा पराभव करीत तृतीय पुरस्कार पटकाविला. तर इंदिरानगर संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सेमी फायनल चे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती व क्रिकेट सामान्यांचा आनंद घेतला.

 


      या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 31000 रुपये व आकर्षक चषक भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या वतीने देण्यात येत असून धन्वंतरी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर अनंताजी कुंभारे व सिटी हॉस्पिटल गडचिरोलीचे संचालक डॉक्टर यशवंत दुर्गे यांच्या कडून द्वितीय पुरस्कार 21000 रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे तर तृतीय पारितोषिक 11,000 रुपये व आकर्षक चषक शिवसेनेचे गडचिरोली तालुकाध्यक्ष गजाननराव  नैताम यांच्याकडून देण्यात येणार आहे. तर चतुर्थ प्रोत्साहनपर  5100 रुपयांचा पुरस्कार क्रिकेट स्पर्धेचे आयोजक श्री अनुराग प्रमोद पिपरे यांच्याकडून देण्यात येणार आहे

Post a Comment

0 Comments