आश्रमशाळा चांदाळा येथील मुलींचा आगळा वेगळा उपक्रम
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चे औचित्य साधून,दंडकारण्य शिक्षण संस्था गडचिरोली द्वारा संचालित अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा चांदाळा येथील मुलींनी सामाजिक जाणिव ठेऊन चांदाळा टोला ते गडचिरोली मार्गावरील अपघाताला आमंत्रण देणाऱ्या रस्त्यावरील खड्यांची डागडुजी करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे,गडचिरोली कारवाफा मार्गावर चांदाळा ते चांदाळा टोला वळणाच्या रस्त्यावर मोठा-मोठे खड्डे पडले होते,मागील काही महिन्यात या खड्यांना चुकविण्याच्या नादात चार चाकी वाहन व अनेक दुचाकी वाहनांचे अपघात झाले होते,याचे गांभिर्य ओळखून अनुदानित आश्रमशाळा चांदाळा येथील विद्यार्थिनींनी व शिक्षक कर्मचाऱ्यानी सदर समाज उपयोगी उपक्रम हाती घेऊन सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चे औचित्य साधून सदर उपक्रम राबविला,सदर उपक्रमाचे गावकरी,परिसरातील रहदारीकर,गावतील प्रतिष्ठित नागरिक ,संस्थापक मुख्याध्यापक यांनी कौतुक केले आहे.
0 Comments