Ideas

रानडुकर शिकार प्रकरणी वन विभागाने केली कारवाई, एका आरोपीला अटक



आलापल्ली वनविभागा अंतर्गत येणाऱ्या अहेरी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 29 मध्ये अवैधरित्या रानडुकर या वन्यजीवाची शिकार केल्याची माहिती योगेश शेरेकर वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव संरक्षण पथक आलापल्ली यांना मिळताच अहेरी चे वनपरिक्षेत्र अधिकारी कु. आरती मडावी व पथक यांच्यासह ते मोका स्थळावर पोहचुन परिसरात शोधमोहिम राबवीली असता संशयीत आरोपीत इसम सोनु मासा पोद्दाडी राहणार प्रभुसदन वसाहत अहेरी यांच्या शेतात मोठया गंजा मध्ये 7.50 किलोग्राम रानडुकराचे मटन आढळुन आले. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. उमरदंड श्रेणी एक यांच्याद्वारे न्यायवैद्यकीय चाचणी करीता रानडुक्कर च्या मटन चे नमुने गोळा करण्यात आले. सदर प्रकरणात भारतीय वन्यजीव अधिनीयम 1972 कलम 2, 29, 39, 44, 52, 56, अन्वये वनगुन्हा क्रमांक 08 /20222 दिनांक 23/12/2022 अन्वये नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणात राणडूक्कर चे मटन 7.50 किलोग्राम, गंज 1 नग,सत्तुर १ नग, लाकडी खोड 1नग,  ताट 1नग मुद्देमाल जप्त करण्यात आले असुन फरार आरोपीत इसम सोनु मासा पोद्दाडी राहणार प्रभुसदन वसाहत अहेरी यांच्या विरोधात शोधमोहीम सुरू आहे सदर प्रकरणात अनेक बडे इसम गवसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



सदरची कार्यवाही ही गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक, डॉ. किशोर मानकर, आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया, गडचिरोली वनवृत्ताचे विभागीय वन अधिकारी जमीर शेख व आलापल्ली चे उपविभागीय वन अधिकारी नितेश शंकर देवगडे यांच्या मार्गदर्शना खाली पार पाडण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी कु. आरती मडावी व वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर हे करीत आहेत. सदर कार्यवाही मध्ये क्षेत्र सहाय्यक राजेश पिंपळकर , वन्यजीव संरक्षण पथकाचे वनरक्षक अनिल पवार, रुपेश तरेंवार, नितेश मडावी, रसिका मडावी, चंद्रशेखर नागुलवार, वनमजुर बडु आत्राम, नानय्या येल्लुर व वाहण चालक सचिन डांगरे, महादेव यांचा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments